Alephata
Selam Agro Industries तर्फे आळेफाटा परिसरात टोमॅटो पिकासाठी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करण्यात आलं. या सत्रात शेतकऱ्यांना कोणती बियाणं निवडावीत, खतांचे योग्य प्रमाण कसे
ठरवावे, आणि जमिनीनुसार खत व्यवस्थापन कसं करावं, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच,
उत्पादन वाढवण्यासाठी शेतात कोणते प्रॉडक्ट्स वापरावेत याचेही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना
सुचवले गेले की त्यांनी Highkel-DF हे प्रॉडक्ट वापरावे, जे टोमॅटो पिकाच्या गुणवत्तेत आणि
उत्पादनात वाढ करण्यास मदत करते. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा चांगला प्रतिसाद दिला.